या राज्यात निवडणुका झाल्यास भाजपला मिळणार वर्चस्व !
दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ । देशात २०१४ नंतर सत्तेपासून भाजपने कॉंग्रेसला सातत्याने दूर ठेवले आहे पण गेल्या काही वर्षापासून देशात होणाऱ्या महागाईपासून जनतात्रस्त झाल्याने आता पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती पण एका सर्व्हेतून पुन्हा देशातील उत्तरप्रदेशात भाजपचे वर्चस्व स्थापन होणार असल्याचे निकष निघत आहेत.
या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपाला २०१४ आणि २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाला ८० पैकी ६७ ते ७३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आघाडीला. ३ ते ६, बीएसपीला ० ते ४ आणि काँग्रेसला १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेशात भाजपाला तब्बल ६३ टक्के मते मिळतील असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर सपा आघाडीला १९ टक्के, बीएसपीला ११ टक्के, काँग्रेसला ४ टक्के आणि इतरांच्या खात्यात ३ टक्के मते जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र लढले तरी ते निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे.
हा सर्व्हे उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघात ७ ते २२ मार्चदरम्यान करण्यात आला. त्यामध्ये ८० हजार ६०० लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. दरम्यान, २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी ६४ जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. तर बसपाने १०, सपाने ५ आणि काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाला ४३.८ टक्के, सपाला ३६.७ टक्के आणि बसपाला १२.९ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या खात्यात २.३ टक्के मते गेली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम