मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर हे उपाय करा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला खूप महत्व दिले आहे. ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुख-समृद्धी लाभते. काही राशींचे ग्रह आणि नक्षत्र असे आहेत की, त्यांना थोड्याशा प्रयत्नात प्रचंड यश मिळते, तर दुसरीकडे अनेकांना रात्रंदिवस मेहनत करूनही जीवनात यश मिळू शकत नाही. ज्योतिष शास्त्रात आणि वास्तूशास्त्रात सांगितलेले काही उपाय अवलंबून व्यक्ती आपले भाग्य बदलू शकते. या उपायांनी कर्माला भाग्याची साथ लाभते. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे. असे केल्याने जीवनात समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जेवताना कधीही चपला घालू नयेत. हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

नियमित पूजा केल्यानंतर देवघरासमाेर दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये देवतांचा आशीर्वाद कायम राहतो. घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर रोज संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा.

ज्योतिषशास्त्रानुसार पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नयेत. हे गोळा करून वाहत्या पाण्यात विसर्जीत करावे. याशिवाय तुम्ही ही फुले खड्ड्यातही पुरू शकता.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सकाळी उठल्यावर आणि स्नान केल्यानंतरच देवाच्या मूर्तीला स्पर्ष करावा. आंघोळ न करता देव घराला स्पर्ष केल्यास देवघराचे पावित्र्य भंग हाेते. लक्ष्मी नाराज हाेते.

ज्योतिषशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा खूप शुभ असतो. नकारात्मक शक्ती देखील या दिशेने लवकर प्रवेश करतात. म्हणूनच या दिशेला गंगेचे पाणी नियमित शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम