
PAN Card नसल्यास द्यावा लागणार दुप्पट टॅक्स !
दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ । देशात आपल्या ओळखीचे व व्यवहाराचे दोन पुरावे महत्वपूर्ण मानले जातात. त्यातील एक म्हणजे PAN Card हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. ज्यामुळे सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. सध्या पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सहसा लोकांना असे वाटते की, पॅन कार्ड हे फक्त भरपूर कमाई करणाऱ्या लोकांसाठीच आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. पॅन कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी बंधनकारक आहे. त्याला आणखी महत्त्व देण्यासाठी केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वित्त विधेयकात त्याबाबत विशेष प्रस्तावही दिला आहे. याशिवाय, जर आपण FD करत असाल तर त्यासाठी देखील आपल्याकडे PAN Card असणे आवश्यक आहे.
हे लक्षात घ्या कि, कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंवा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची FD करण्यासाठी PAN Card आवश्यक आहे. तसेच बँकिंग कंपनी, सरकारी बँक, पोस्ट ऑफिस किंवा नॉन-बँकिंग फायनान्सिंग कंपनीमध्ये एफडी करताना पॅन कार्ड आवश्यक आहे. इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 194A नुसार, FD वर वर्षभरात 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाल्यास 10% दराने TDS कापला जाईल. मात्र जर बँकेमध्ये पॅन कार्डचे डिटेल्स दिले नसतील तर ही वजावट 20 टक्के असेल. ज्येष्ठ नागरिकांना यावर काही प्रमाणात सूट दिली जाते आहे. त्याअंतर्गत FD वर 50,000 रुपयांचे व्याज टॅक्स फ्री असेल. तसेच जर आपल्याला मिळालेली व्याजाची रक्कम ही सूट मर्यादेत असेल आणि तरीही बँकेने त्यावर TDS कापला असेल, तर ITR भरताना त्याबाबत क्लेम करता येऊ शकेल.
FD वर अशा प्रकारे मोजला जातो टॅक्स
ITR मध्ये दरवर्षी आपल्या एकूण उत्पन्नामध्ये FD मधून मिळणारी कमाई जोडली जाते. जरी त्या वर्षी व्याजाचे पैसे मिळाले नाहीत तरी बँकेकडून ते पैसे FD च्या मॅच्युरिटीवर एकत्र जोडून दिले जातील. मात्र ITR मध्ये दरवर्षी त्याचा उल्लेख करावा लागेल. हे लक्षात घ्या की, बँकांकडून व्याजावर टीडीएस कापला जातो, जो नंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे एड्जस्ट केला जातो. जर आपण 3 वर्षांसाठी FD केली असेल तर बँकेकडून प्रत्येक वर्षाच्या शेवटी TDS कापला जाईल. तसेच जेव्हा FD मॅच्युर होईल, तेव्हा ठेवीदाराला व्याज आणि मुद्दल दोन्ही मिळेल. याव्यतिरिक्त, DIGCI द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतच्या FD चा विमा देखील उतरवला जातो.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम