‘तुम्ही चुकिचं वर्तन करणार नाही तर मीही ओरडणार नाही’ ; तापसी पन्नू

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक तापसी पन्नू आहे. तिच आणि पापाराझींच काही जास्त जमत नसल्याचं चित्र नेहमीच दिसत. ती नेहमी पत्रकारांवर रागवतांना दिसते. नुकतच तिला राजू श्रीवास्तव यांच्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हाही ती चांगलीच भडकली होती. तिच्या या वागण्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. मात्र यावेळी ती जरा चांगल्या वागण्याचा प्रयत्न करतांना दिसली.

 

ती मुंबईत आयुष्मान खुरानाने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती. त्यावेळी तेथे पापाराझींही फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जमा होते. तापसी गोल्डन ब्लाउज आणि लाल रंगाच्या साडीत दिसली. तापसीच्या स्वभावामुळे पापाराझी तिच्यापासुन लांबच होते. मात्र यावेळी तिने कॅमेऱ्यांकडे हसत पोझ दिली आणि तिने पापाराझींसोबत चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

याचा एक व्हिडिओ विरल भयानी यांच्या इंस्टाग्रामला पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक कॅमेरामॅन तापसीला तिचे फोटो क्लिक करण्याअगोदरच तिला कृपया ओरडू नका अशी विनंती करताना ऐकू येत. तो म्हणातो, ‘आज ओरडू नका’ त्यावर तापसी त्याला हसत उत्तर देत म्हणते, ‘तुम्ही चुकिचं वर्तन करणार नाही तर मीही ओरडणार नाही’. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.एकाने कमेंट केलीय की, ‘ हि जया बच्चनची लाइट कॉपी आहे.’ तर एकानं तिची कंगनाशी तुलना केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम