तुम्हाला जर असा व्हिडीओ फोन आला तर उचलू नका; होणार ब्लकमेल
दै. बातमीदार । ४ नोव्हेबर २०२२ तुम्ही जर नेहमी व्हॉट्सअॅपवरून आलेले व्हिडीओ फोन उचलत असतील तर तुम्हाला खूप महागात जावू शकते. अनेकदा आपण सेव्ह नसलेल्या नंबर वरून कॉल आल्यास बहुतांशी इग्नोर करतो. मात्र हाच कॉल व्हॉट्सअॅपवरून आल्यास आपण बरेचदा उचलतो. मात्र हे करतानाही तुम्हाला आता सावध राहाण्याची गरज आहे. मागल्या अनेक दिवसांपासून सेक्स्टॉर्शनचे अनेक प्रकरण उघडकीस आलेत. याच प्रकरणाला बळी पडणाऱ्या एका व्यक्तीची कथा तुम्हाला आणखी थक्क करेल.
सेक्स्टॉर्शन हे सध्या चर्चेत असलेलं आणि सोशल मीडियावर खळबळ उडवणारा स्कॅम आहे. स्कॅमच्या अगदी काही सेकंदांनी यूजर्सची झोप उडून जाइल असे काहीसे होते. या स्कॅममध्ये यूजरला एक व्हिडीओ कॉल येतो आणि तिथून खऱ्या स्कॅमला सुरूवात होते.
एका व्यक्तीसह घडलेली ही खरी घटना आहे. हा व्यक्ती संध्याकाळी घरी आलेल्या पाहुण्यांसह गप्पा करत बसला होता. तेवढ्यात त्याला एका अननोन नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. सुरूवातीला त्याने तो इग्नोर केला. मात्र दोन ते तीनदा तोच कॉल आल्यानंतर त्याला तो महत्वाचा वाटला. कॉल उचलताच पुढली महिला त्याला व्हिडीओ कॉलवर कपडे काढताना दिसली. यूजरने कॉल डिस्कनेक्ट करेपर्यंत स्कॅमरचं काम झालेलं होतं. काही वेळानंतर या व्यक्तीस पैशांची मागणी करणारा ब्लॅकमेलींग कॉल येतो. हा व्यक्ती भीतीने पैसेही देतो. मात्र त्याची समस्या इथेच संपत नाही. या संपूर्ण घटनेत व्यक्तीचा काहीही दोष नसताना त्याला टॉर्चर केल्या जातं. यालाच सेक्स्टॉर्शन असं म्हणतात. अनेक लोक भीतीने पोलिसांत तक्रारही दाखल करत नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम