तुम्हाला जर हे लक्षण असतील तर डायबिटीस ?
दै. बातमीदार । १२ नोव्हेबर २०२२ तुम्ही दिवसभर कामात जरी व्यस्थ असले तरी तुम्ही तुमच्या फिटनेसची काळजी घेत असालाच त्यासोबतच डाएट कडे लक्ष असतच अस नाही, खूप कमी लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत, अशातच डायबिटीसचा धोका तुम्हाला होवू शकतो, हा असा आजार आहे जो तुम्हाला आयुष्यभर असतो.
डायबिटीस झालेल्या सगळ्यांना खूप त्रासांना सामोरे जावे लागते; जसे की, सतत वॉशरूमला जायला लागण, खूप भूक लागण, तहान लागणं, वजन एकदम वाढणं किंवा कमी होणं, हाता पायांना मुंग्या येण; पण या सगळ्यापेक्षाही खूप वाईट परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर.जगभरात डायबिटीसचा धोका वाढतो आहे; त्यामुळे त्याबद्दलची भीतीही वाढते आहे. डायबिटीस कोणालाही होऊ शकतो. भारतात जवळ जवळ ७.७ करोड लोकं डायबिटीस ग्रस्त आहेत. तज्ञांचा असा अनुमान आहे की २०४५ पर्यंत ही संख्या १३ करोड पर्यंत जाईल. डायबिटीसची सुरुवातीची लक्षण कळली तर आपण यावर प्रतिबंध करू शकतो; जर तुम्हाला सतत स्किन प्रॉब्लेम होतो आहे तर हे लक्षण डायबिटीसचही असू शकत.
१. त्वचा सुजणे- हे बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होऊ शकते, याने त्वचेला जळजळ होते ज्यामुळे तुमची त्वचा खूप सुजते आणि लाल होते. याशिवाय बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनचा सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो.
२. पुरळ आणि फोड येणे – डायबिटीसच्या लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन येणे, पुरळ येणे हे खूप कॉमन आहे. या इन्फेक्शन मुळे, तुम्हाला त्वचेवर पुरळ आणि बारीक फोड येयला सुरू होतात, दोन बोटांच्या मध्ये, योनीमार्गात याचे प्रमाण जास्त आहे आहे.
३. सतत खाज सुटणे – डायबिटिसच्या माणसांना हा त्रास होतच असतो; त्वचा कोरडी पडू लागते त्यातली नरिशमेंट संपते आणि सतत खाज सुटते.
४. त्वचा काळी पडणे – आपल्या त्वचेचा मूळ रंग बदलून तिचा रंग काळसर किंवा तपकिरी होऊ लागतो; याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात. हे डाग मानेवर, कंबरेवर, हातात, कोपऱ्यावर आणि गुडघ्यावर दिसतात.
५. डायबेटिक अल्सर- जरी ही समस्या अगदी दुर्मिळ आहे, तरी ज्या रुग्णांना आधीच डायबिटीसचा त्रास असेल तर त्यांना अल्सर होऊ शकतो. न्यूरोपॅथीचा त्रास आहे त्यांना मधुमेहाचे फोड येतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम