तुम्ही जर ‘हे’ ३ व्हिडिओ गुगलवर सर्च केले तर होईल अटक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । देशभरात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. दिवाळीत अनेकांनी दीप प्रज्वलन करून, मिठाईचे वाटप करून आणि फटाके फोडून दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. परंतु, दिवाळीत तुम्ही जर बंदी असलेले ३ व्हिडिओ गुगलवर सर्च केले असतील तर तुम्हाला थेट अटक होवून जेलची हवा खावी लागू शकते. कोणत्या त्या ३ गोष्टी आहेत. ज्यावर गुगलवर सर्च करता येत नाहीत. जाणून घ्या डिटेल्स.

बॉम्ब कसे बनवावे?
भारतात बॉम्ब बनवण्यावर बंदी आहे. यासाठी लायसन्स घ्यावे लागते. परंतु, तुम्ही जर चुकूनही दिवाळीत चुकीच्या पद्धतीने बॉम्ब कसा बनवावा, असं काही सर्च केले असेल तर ते तुमच्यासाठी चांगले नाही. बॉम्ब बनवण्यासाठी तुम्ही जर गुगलचा वापर केला असेल तर ते चुकीचे आहे. यावर भारतात बंदी आहे. तुम्ही जर गुगलवर बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग घेतली आहे, असे असेल तर गुगल याची माहिती पोलिसांना देते. त्यामुळे तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते.

बंदूक कशी बनवावी?
बॉम्ब सोबत बंदूक म्हणजेच गन कशी बनवावी, यावर भारतात बंदी आहे. दिवाळी दरम्यान देसी कट्ट्याची मागणी जास्त वाढते. देसी कट्टा बनवण्याची सोपी पद्धत गुगलवर आहे. सोबत दिवाळीत अनेक प्रकारे अन्य धोकादायक धंदे सुरू होते. परंतु, गुगलवर गन बनवण्याची पद्धत जाणून घेणाऱ्यावर गुगलचा वॉच असतो. त्यामुळे तुम्ही चांगलेच अडचणीत येवू शकता.

कुठून दारूगोळा खरेदी-विक्री करायची?
बॉम्ब बनवण्यासाठी दारूगोळाची गरज लागते. दारूगोळा एक स्फोटक पदार्थ आहे. याला मिळवणे सोपे असते. त्यामुळे गुगलवर सर्च करीत असल्यास हे बेकायदेशीर आहे. ऑनलाइन मोडने दारूगोळा खरेदी करण्याचे लोकेशन आणि पेमेंट केल्यास तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जावू शकते, तुम्हाल थेट जेलची हवा खावी लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम