रात्री विनाकपडे झोपल्यास आरोग्यास होतील हे फायदे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ मार्च २०२३ । सकाळपासून कामावरून रात्री घरी आलो कि मग रात्री झोपताना सैल कपडे घालतो. असे कपडे घातल्यामुळे आपल्याला बरं वाटतं तसेच आरामदायक कपडे घालून झोपल्याने चांगली झोप लागते, ज्यामुळे लोक असं करतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे की तुम्ही विनाकपडे झोपलात तर त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. चांगल्या झोपेने तुमच्या आरोग्यामध्ये अनेक सुधारणा होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या फायद्यांविषयी.

१.तणाव आणि चिंता कमी करते विनाकपडे झोपल्याने तणाव कमी होते, तसेच चिंता ही कमी होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत झोपला असाल तर, त्वचेच्या संपर्कामुळे शरीरातील ऑक्सीटोसिनची पातळी वाढते, ज्यामुळे तणावाची पातळी कमी होते. जर तुम्ही एकटे झोपत असाल तर ते तुमचे शरीर थंड ठेवते, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.

२. वजन वाढत नाही संशोधनात असे दिसून आले आहे की रात्री चांगली झोप न मिळाल्याने वजन वाढू शकते. कपड्यांशिवाय झोपल्यास चांगली झोप लागते आणि वजनही वाढत नाही. याशिवाय कपड्यांशिवाय झोपल्याने तुमचे शरीर थंड राहते, त्यामुळे चरबीचे उत्पादन अधिक होते आणि चयापचय चांगले होते.शरीरातील ब्राऊन फॅट्सचे प्रमाण वाढल्याने लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

३. हृदयरोग आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी यूएस सीडीसीच्या मते, झोपेच्या कमतरतेमुळे इतर समस्यांसह हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो. जर तुम्ही तुमचे कपडे काढून झोपलात तर तुम्ही जास्त काळ चांगली झोप लागू शकते. त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोकाही कमी होईल.

४. पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते पुरुषांनाही कपडे न घालता झोपण्याचा फायदा होतो. घट्ट अंडरवेअर आणि कमी शुक्राणूंची संख्या यांच्यात खोल संबंध असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. अभ्यासातील 656 पुरुषांपैकी, ज्यांनी बॉक्सर परिधान केले त्यांच्या शुक्राणूंची संख्या घट्ट अंडरवेअर परिधान करणाऱ्यांपेक्षा जास्त होती.

५. योनीचे आरोग्य सुधारते घट्ट कपडे घातल्याने किंवा अंडरवेअर घातल्याने तुम्हाला घाम येत असल्यास योनिमार्गाजवळ यीस्ट संसर्गाचा धोका वाढू शकतो. विशेषत: अंडरवेअर बदलल्यानंतर रात्री झोप येत नसेल तर. कपडे न घालता झोपल्याने यीस्टचा संसर्ग टळतो आणि योनीमार्गही निरोगी राहतो. इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहेत, न्यूज १८ लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम