प्रवासात होतात उलट्या तर या वस्तू करू नका सेवन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  नेहमी आपण बाहेर गावी प्रवासासाठी निघाल्यानंतर बसमध्ये किवा कारमध्ये बसल्यावर अनेक लोकांचं डोकं दुखू लागतं, चक्कर आल्यासारखी वाटते किंवा उलटीचा त्रास होतो. तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का ? मोशन सिकनेसमुळे हा त्रास होऊ शकतो. यामुळे अनेक लोकांना प्रवासादरम्यान उलटी न होण्याची गोळी अथवा औषध घ्यावे लागते. हा त्रास बऱ्याच वेळेस खराब अन्नामुळे होतो किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी काही विशिष्ट पदार्थ खाल्यामुळे उलटी होते. कोणते असे पदार्थ खाल्यामुळे बेचैन वाटणे, मळमळ, उलटीचा त्रास होतो हे जाणून घेऊया. पुढल्या वेळेस प्रवासापूर्वी हे पदार्थ खाणे टाळा.

केक अथवा आईस्क्रीम
तुम्हाला केक, आईस्क्रीम असे पदार्थ जरी खूप आवडत असले तरी प्रवासापूर्वी हे पदार्थ खाणे टाळावे. खरंतर केक, आईस्क्रीम यासारख्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता किंवा उलटी होऊ शकते. त्याशिवाय प्रवासापूर्वी कुकीज, पिझ्झा, बर्गर अथवा तळलेले पदार्थही खाणे टाळावे.

चहा- कॉफीचे सेवन टाळावे
बहुतांश व्यक्तींना दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करायला आवडते. तुम्हालाही मेंदू ताजातवाना ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तरीही प्रवासापूर्वी हे पेय पिणे टाळावे. चहा- कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो, ज्यामुळे तुमची झोप तर उडते, फ्रेशही वाटते पण याच घटकामुळे तुम्हाला नर्व्हस किंवा बेचैनही वाटू शकते. तसेच त्यात दूध असते, ज्यामुळेही उलटीची भावना होऊ शकते. त्यामुळेच कोणत्याही प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे अतिसेवन टाळावे.

फळांचा ज्यूस
अनेक लोकांना प्रवास सुरू करण्यापूर्वी फळांचा ज्यूस पिणं आवडतं. मात्र असं चुकूनही करू नका. फळांचा रस अथवा ज्यूस प्यायल्याने उलटीचा त्रास होऊ शकतो. खरंतर फळांमध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे आपली एनर्जी कमी होते. फळांचा ज्यूस प्यायल्यानवे तुम्हाल लगेच एनर्जेटिक वाटेल पण त्याच वेगाने तुमची एनर्जी कमीही होऊन उलटी होऊ शकते . त्यामुळेच प्रवासापूर्वी फळांचा ज्यूस पिणे टाळावे.

सॉस किंवा केचअप
अनेक लोक प्रवासापूर्वी काही खाऊन घेण्यावर भर देतात. सहज , सोपं आणि पटकन खाता येईल असे पदार्थ खायचा लोकांचा प्रयत्न असतो. तेव्हा ते पॅटीस किंवा एखादा तळलेला पदार्थ खाऊ शकतात. अशावेळी त्यासोबत सॉस किंवा केचअपही भरपूर खाल्ला जातो. मात्र त्यामध्ये असलेली अतिरिक्त साखर ही तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या कृत्रिम साखरेमुळे चिंता आणि नैराश्य वाढू शकते. त्यामुळे केचअपचे सेवन टाळावे.

मसालेदार पदार्थ
जास्त तेल असलेले किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तसेच प्रवासापूर्वी तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्याने आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. तेलकट पदार्थांमुळे डोकेदुखी अथवा चक्कर येण्याचा त्रास होतो, उलटीही होऊ शकते. त्यामुळे प्रवासापूर्वी तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा पचनास हलके असे पदार्थ खावेत.

ब्रेडटोस्ट
कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी ब्रेड बटर किंवा ब्रेड सँडविच खाऊ नये. ब्रेड हा एक प्रक्रिया केलेला पदार्थ आहे. यामुळे तुमची एनर्जी लेव्हल झटक्यात तर वाढते पण तुम्हाला अस्वस्थही वाटू शकते. त्यामुळे एखादा प्रवास सुरू करण्याआधी ब्रेडटोस्ट, सँडविच, किंवा बर्गर असे ब्रेडयुक्त पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम