आजपासून ट्विटर वापरणार असाल तर द्यावे लागणार पैसे !
दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ । तुम्ही जर ट्विटर युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आजपासून ट्विटवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु होणार आहे. एलोन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसात अनेक बदल होत आहेत. यासोबतच ट्विट एडिट बटणासह इतर फिचर्सही लाँच करण्याची शक्यता आहे.
दरम्यान ट्विटर पुन्हा एकदा आपल्या यूजर्ससाठी ब्लू सब्सक्रिप्शन पॅकेज लॉन्च करणार आहे. ही सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर युजर्स पैसे भरून ब्लू टिक मिळवू शकतील. यासोबतच कंटेंट एडिट व्यतिरिक्त त्यांना इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत. मात्र, अॅपल आयओएस वापरकर्त्यांसाठी ही सेवा महागणार आहे. याबाबत ट्विटर कंपनीने सांगितलं की, ट्विटर सोमवारी 12 डिसेंबरला ब्लू टिक सेवा पुन्हा सुरु करणार आहे. या सेवेसाठी दरमहा आठ डॉलर (सुमारे 659 रुपये) शुल्क आकारण्यात येईल. दरम्यान अँड्रॉईड युजर्सच्या तुलनेत आयफोन युजर्ससाठी ब्लू टिक सेवा महाग असणार आहे. आयफोन युजर्ससाठी ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 11 डॉलर (सुमारे 907 रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम