हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास होणार जेलवारी !
दै. बातमीदार । ३ मे २०२३ । देशभरातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असतो. पण तुम्ही आतापर्यत प्रवासात व्हिडीओ, गाणे वाजवत असतात. सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही मोठमोठ्याने मोबाईलमधील गाणे वाजवीत असल्याने आता तुम्हाला हे गाणे वाजविणे महाग पडू शकते. त्यासाठी तुम्हाला जेलवारी सुद्धा होवू शकते. फोनवरही जोरात बोलतात. अशा लोकांसाठी मोबाईल वापराबाबत एक नवा नियम आला आहे, ज्यामध्ये तुम्ही बसमध्ये प्रवासादरम्यान फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच, 3 महिन्यांची शिक्षादेखील होऊ शकते
मुंबईत नवीन नियम लागू
सध्या हा नियम (नवीन मोबाईल नियम) बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने लागू केला आहे. या नियमांतर्गत बसमध्ये हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
बेस्टने या आठवड्यापासून मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजविण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. नव्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी बसेसमध्ये सूचना चिकटविण्याचे काम सुरू झाले आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे.
नवीन नियम का आणण्यात आला ?
मोबाइल फोनबाबत नवा नियम आणण्यामागचे कारण म्हणजे ध्वनी प्रदूषण. यासोबतच बस प्रवाशांच्या गैरसोयीपासून वाचण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. नव्या परिपत्रकानुसार आवाजाची डेसिबल पातळी कमी ठेवण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बस प्रवाशाला फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही. तुम्हाला संगीत ऐकायचे असल्यास, हेडफोन सोबत घेऊन जाणे अधिक चांगली कल्पना आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम