वडिलांच्या निधनानंतर लगेच गौतमीने घेतली सुपारी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३ | सध्या राज्यात आपल्या डान्सने लोकप्रिय झालेली गौतमी पाटील ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फक्त सोशल मीजियावर नाही तर ज्या कार्यक्रमात ती जाते त्या कार्यक्रमात तिला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येनं गर्दी असते. काल दहीहंडीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीनं हजेरी लावली होती. यावेळी गौतमीनं तिच्या डान्सनं सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, दुसरीकडे असे काही नेटकरी आहेत ज्यांना गौतमीचं असे डान्स करणे पटलेलं नाही.

अनेकांनी वडिलांच्या निधनानंतर लगेच एका कार्यक्रमात हजेरी लावत डान्स केल्यामुळे तिला ट्रोल केले आहे. तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

गौतमीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अनेकांना वाटले होते की तिला दहीहंडीनिमित्तानं मिळालेल्या सगळ्या सुपाऱ्या ती रद्द करेल. मात्र, तिनं असं न करता थेट कार्यक्रमात हजेरी लावली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर दुसरीकडे गौतमीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत शेवटच्या क्षणी कोणतीही सुपारी रद्द करता येत नाही असं म्हणतं तिची बाजू घेतली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम