दै. बातमीदार । ५ जानेवारी २०२३ गेल्या काही महिन्यापासून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ने या चित्रपटातील सुमारे 10 दृश्ये बदलण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय काही संवादही बदलण्यात आले आहेत। खरं तर जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या बोलांवर तर काहींनी दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगाच्या बिकिनीवरुन आक्षेप घेतला. या वादांमुळेच सेन्सॉर बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटातील ‘रॉ’ हा शब्द बदलून ‘हमारे’ आणि ‘लंगडे लुले’ऐवजी ‘टूटे फुटे’, ‘PM’ या शब्दाऐवजी ‘राष्ट्रपती किंवा मंत्री’ हे शब्द वापरले जाणार आहेत. याशिवाय ‘पीएमओ’ हा शब्द 13 स्थानावरून काढून टाकण्यात आला आहे. इतकेच नाही तर ‘अशोक चक्र’ला ‘वीर पुरस्कार’, ‘पूर्व केजीबी’ऐवजी ‘पूर्व एसबीयू’ आणि ‘मिसेस भारतमाता’ बदलून ‘हमारी भारतमाता’ करण्यात आले आहे. याशिवाय ‘स्कॉच’ ऐवजी ‘ड्रिंक’ हा शब्द वापरला जाईल आणि ‘ब्लॅक प्रिझन, रुस’ याऐवजी ऐवजी आता फक्त ‘ब्लॅक प्रिझन’ हा शब्द प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग…’ हे गाणे रिलीज झाल्यापासूनच वादाला तोंड फुटले आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत. या गाण्यात दीपिकाने भगवा रंगाची बिकिनी घातली आहे, त्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे. हे गाणे पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने हे गाणे पास का केले, असा सवाल उपस्थित केला जातोय.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम