“आधार” बाबत महत्वपूर्ण बातमी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० नोव्हेंबर २०२२ । प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख म्हणून वापरल्या जाणाऱ्या आधार कार्डाच्या सुरक्षेबाबत अनेक जण चिंताग्रस्त असतात, कारण केवळ आधार लक्षात ठेवून अथवा छायाचित्र काढून कोणीही चुटकीसरशी त्याचा गैरवापर करू शकतो. परंतु आताच्या नवीन आधार कार्डामुळे या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

‘आधार’ च्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या ट्विटनुसार, या नवीन आधार कार्डांवर १२ अंकी आधार क्रमांकाऐवजी शेवटचे ४ अंक वापरले जातील.

या ट्विटमध्ये ‘आधारकार्डधारक आधार क्रमांकाऐवजी व्हर्चुअल आयडी (व्हीआयडी) क्रमांक वापरूनही आधार कार्ड डाउनलोड करू शकतात’ असे लिहिले आहे.

नवीन आधार डाउनलोड करण्याची प्रक्रिया :-
◆ आधारकार्डधारकांनी https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

◆ येथील ‘डाउनलोड आधार कार्ड’ या पर्यायावर क्लिक करावे.

◆ आता येथे तुमच्या आधार कार्डावरील खालच्या बाजूला असलेला १६ अंकी व्हीआयडी प्रविष्ट करा (व्हीआयडी नसल्यास याच संकेतस्थळावरून व्हीआयडी क्रमांक मिळवता येतो)

◆ व्हर्चुअल आयडी, कॅप्चा व वन टाइम पासवर्ड लिहून पीडीएफ फाईल डाउनलोड करा.

◆ या फाईलला उघडण्यासाठी पासवर्ड दिल्यास, आपल्याला दिसेल की, आधार कार्डावर बारापैकी आठ अंक “फुली” करून लपवले असून, फक्त चारच अंक दृश्यमान आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम