माजी आरोग्य मंत्र्याचे कोरोना बाबत महत्वाचे विधान !
दै. बातमीदार । २२ डिसेंबर २०२२ । देशात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. त्यासाठी केद्र सरकारने सुद्धा सर्व राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले तर दुसरीकडे राज्याचे अधिवेशन नागपूर येथे सुरु असतांना राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले कि, कोरोना रोखण्यासाठी त्रिसुत्री आतापासूनच राबविण्याची गरज आहे. जगात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा उद्रेक झाला आहे.
आजपर्यंत देशात सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे. टोपे पुढं म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारले होते, त्याच्या स्थितीचा आढावा घेणे, आयसोलेश वॉर्ड सुरू करणे, औषधांची पूर्तता करणे, आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. तसेच तातडीने स्टेट टाक्स फोर्स गठित करण्याची आवश्यकता आहे. सोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असही ते म्हणाले. देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केलं त्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये टोपे यांच्याकडे आरोग्य खात्याची धुऱा होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम