अखेर इम्रान खान यांना जामीन मंजूर ; कार्यकर्त्यांनी केले स्वागत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ मे २०२३ ।  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शनिवारी रात्री लाहौर येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्ते, महिला आणि लहान मुलांसह सर्वजण जमान पार्क येथे उपस्थित होते. इम्रान खानच्या समर्थकांनी रस्त्यावर मार्च काढत आंनदोत्सव साजरा केला.

जामीन मिळाल्यानतंरही इम्रान खान बराच वेळ हायकोर्टाच्या परिसरात होते. पोलिसांकडून पुन्हा संभाव्य अटकेपासून वाचण्याकरता ते लिखित आदेशाची प्रतीक्षा करत होते. तसंच, एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी त्यांना हायकोर्ट परिसर न सोडण्याचे आदेश दिले होते. यामुळ इम्रान खान यांनी संताप व्यक्त करत पुढच्या १५ मिनिटांत इस्लामाबादचे रस्ते उघडले नाही तर ते मोठं पाऊल उचलू, असा इशारा दिला होता. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस हस्तक्षेप करत समर्थकांची समजूत काढली आणि इम्रान खान यांना न्यायालयीन परिसर सोडण्यास परवानगी मिळाली.

दरम्यान, या काळात हायकोर्ट परिसरात अनेकवेळा हवेत गोळीबार झाला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस अधिकारी अलर्ट झाले होते. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षित आहेत आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे, अशी माहिती इस्मामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली. श्रीनगर हायवे एच ११ येथेही गोळीबाराचा आवाज आला होता. तसंच, दोन ते तीन दिवस येथे इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली होती. कालांतराने ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

इम्रान खान म्हणाले की, “माझं केलेलं अपहरण आणि त्यानंतर माझ्या अटकेची कहाणी मी पाकिस्तानातील संपूर्ण जनतेला जाऊन सांगणार आहे. मी सुरक्षित बाहेर पडण्यास यशस्वी ठरलो. दबावात येऊन अखेर त्यांनी मला जाण्यास परवानगी दिली. बाहेर निघाल्यावर मला कळलं की रस्त्यावर ट्राफिक नाहीय, म्हणजेच कोणताही धोका नव्हता.” या आठवड्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पाकिस्तानात हिंसाचार उफाळून आला होता. परंतु, त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या अटकेला अवैध ठरवले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम