२०२४ मध्ये आपटून टाकू ; राणेंचा कोल्हेना दम !
दै. बातमीदार । १२ जानेवारी २०२३ । राज्यातील भाजप व राष्ट्रवादी वाद गेल्या काही दिवसापासून सातत्याने होत असतांना देखील पुन्हा या वादाला आता भाजप आ.नितेश राणे यांनी थेट अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमोल कोल्हे यांच्यावर एकेरी टीका केली आहे.
अमोल कोल्हे पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. तो नावासाठी खासदार झाला आहे. त्याला 2024 ला आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. असे म्हणत आमदार नीतेश राणे यांनी खासदार अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली आहे. यावेळी नीतेश राणे म्हणाले, दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे. आणि अजित दादा यांना अमोल कोल्हे लिहून देतो आणि ते वाचून दाखवतात. असे म्हणत नीतेश राणे यांनी अजित पवार यांच्या छत्रपती संभाजीमहाराजांवरुन केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. धर्मवीर नावाची पदवी त्यांना पुसून टाकायची आहे असे म्हणत अजित पवार यांना यावेळी धारेवर धरले.
यावेळी नीतेश राणे म्हणाले, 2024 ला अमोल कोल्हेला आपटून टाकू. अमोल कोल्हे कुठेही भेटू दे त्याला दाखवतोच असं नितेश राणे यांनी म्हंटले आहे. याशिवाय कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. त्याला 2024 ला आपटून टाकू. नितेश राणे यांनी यापूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. राणेंनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर देत, ‘टिल्ल्या लोकांनी असे काही सांगायचे कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती’, असे म्हणत टीका केली होती. यावर लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. अशा शब्दांमध्ये नीतेश राणे यांनी पलटवार केला होता. आता पुन्हा एकदा नीतेश राणे यांनी अजित पवारांना डिवचले आहे. यात अमोल कोल्हेंनाही ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम