रावेर तालुक्यातील 42 गावांमध्ये आमदार पाटलांकडून शेत रस्त्यांचा धडाका
सावदा प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील 43 गावांमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांकडून शेत रस्त्यांचा धडाका सुरू झाला आहे. अनेक गावांमध्ये शेत रस्त्यांचे खडीकरण करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आमदार पाटील यांच्याकडून होत असल्याचे शेतकरी सुखावला जात आहे.
रावेर तालुका हा केळीसाठी प्रसिद्ध असला तरी रस्त्यांच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर थेट माल ट्रक जात नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर द्वारे केळी वाहतूक करावी लागत असते यामुळे शेतकऱ्यांच्या केळीला कमी भाव मिळत असतो, व आर्थिक नुकसान सहन करावे लागत असते म्हणून, आमदार पाटलांनी शेतकऱ्यांच्या बांधावर थेट माल ट्रक जावी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून मागेल त्याला शेत रस्ता देण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे तापी पट्ट्यातील शेतकऱ्यांमुळे मोठे आनंदाचे वातावरण आहे.
रावेर तालुक्यात काळी व कसदार जमीन आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर काळ्या मातीत मोठा चिखल होऊन केळी वाहतूक करणारी वाहने चिखलात रुतत असतात यामुळे शेतकऱ्याना वेळ व आर्थिक फटका सहन करावा लागत असतो. हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे शेत रस्ते दुरुस्त करण्यासंदर्भात आमदार पाटलांनी सांगितले आहे असे तुषार बोरसे यांनी सांगितले आहे.
स्वखर्चातून रस्ते
आमदार फंड व इतर निधीतून खर्च करण्यासाठी तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे आमदार पाटलांनी स्वखर्चातूनच चिखल झालेल्या क्षेत्र रस्त्यांमध्ये मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव आमदार स्वखर्चातून शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करत असल्याचे बोलले जात आहे.
बारा ट्रॅक्टर सह 18 टिप्पर 24 तास सज्ज
शेत रस्त्यांच्या कामासाठी आमदार पाटलांकडून 12 ट्रॅक्टर व 18 टिप्पर 24 तास काम करीत आहे. ऐनपूर भागात बारा टिप्पर तर उधळी रंनगाव, रायपूर सुतगाव सावदा परिसरात 12 ट्रॅक्टर व बारा टिप्परने मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे.
या गावांमध्ये आहे कामे सुरू
उधळी खुर्द,उधळी बुद्रुक तासखेडा गहूखेडा रनगाव रायपुर सुतगाव एनपुर , कोचुर या गावांसह परिसरातील गावांमध्ये आमदार पाटील यांच्याकडून शेत रस्ते दुरुस्तीचे स्वखर्चातून काम सुरू आहे.
पावसाळ्यामध्ये शेत रस्ते व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ व आर्थिक फटका सहन करावा लागत होता परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आमच्या गावातील रस्ते दुरुस्त होण्यात मदत मिळत आहे व थेट बांधावर केळीची विक्री होत असल्याने भावही चांगला मिळत आहे.
रुपेश पाटील
माजी सरपंच रायपुर
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम