बंगालमध्ये देखील दोन महिलांना नग्न करून जमावाने केली मारहाण !
दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ । देशातील मणिपूरमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून मोठा हिसांचार सुरु असतांना नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन महिलांना भर रस्त्यावर नग्न करीत परेड करण्यास भाग पाडलेल्या ८०० ते १ हजार लोकांवर गुन्हे दाखल होण्याचे काम सुरु असून तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चोर समजून दोन महिलांना नग्न करून जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळील आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम