जळगावात ‘त्याला’ जनतेने लई धुतला ; कारण वाचून व्हाल थक्क !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या एका जणाला जनतेने चांगलाच चोप दिल्याची घटना दि.६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी बँकेत महिला कर्मचारी नोकरीला आहे. बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौकत अली अब्दुल गफ्फार (वय-४२) रा. कासमवाडी, जळगाव हा तिथे आला. त्यावेळी महिला कर्मचाऱ्याशी बोलत असतांना संभाषणाचे व्हिडीओ शुट‍ करत होता. दरम्यान, आपला व्हिडीओ शुट करत असल्याचे महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच आरडाओरड करून बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर घडलेल्या प्रकारनंतर संतप्त नागरीकांना त्याला चांगला चोप देवून शहर पोलीसांच्या स्वाधिन केले. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी पहायला मिळाली. महिलेचे नातेवाईक देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम