राज्यातील काही जिल्ह्यात उन सावलीचा खेळ तर पावसाचा अंदाज कायम !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० सप्टेंबर २०२३ | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्याचा फायदा राज्याला होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसाच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. हातातून जात असलेल्या पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कोटा, गुणा, सिधी, रांची ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. वायव्य राजस्थानपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे गुजरातमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे.

आज विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षाही हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम