दहा दिवसात सोन्याचे दर इतके आले खाली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | अखेर सोने-चांदीला डॉलरपुढे लोटांगण घ्यावे लागले असून २१ ऑगस्टपासून सोने-चांदीने जोरदार घौडदौड केली होती. दहा दिवसांतच सोन्याने 800 रुपयांचा तर चांदीने 4000 हून अधिकची उसळी घेतली होती. सप्टेंबर महिन्यात दोन्ही धातू यापेक्षा उंच उडी घेतील, असा काही तज्ज्ञांचा दावा होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2 आणि 4 तारखेला सोने वधारले होते. पण चांदीला विशेष कामगिरी बजावता आली नाही. या आठवड्यात सोने-चांदीला मोठी झेप घेता आली नाही. दोन दिवसांपासून दोन्ही धातूंमध्ये पडझड सुरु आहे. जागतिक बाजारात डॉलरने आगेकूच सुरु ठेवली आहे. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली आले आहेत. आता दरवाढीचे सीम्मोलंघन कधी होते, याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागेल आहे. तर स्थानिक खरेदीदारांना सोने-चांदी खरेदीची चांगली संधी चालून आली आहे.

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्यात दोन दिवस तेजीचे होते. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भाव जैसे थे होते. 4 सप्टेंबर भाव 100 रुपयांनी वाढले. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी भाव घसरले. एकूण 300 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये

प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदीत 3000 रुपयांची घसरण

सप्टेंबर महिन्यात चांदीला सूर गवसला नाही. पहिल्या आठवड्याची सुरुवातच घसरणीने झाली. 1 सप्टेंबर रोजी 500 रुपयांची, 2 सप्टेंबरला 200 रुपयांची घसरण झाली. 4 सप्टेंबर रोजी चांदी किलोमागे 700 रुपयांनी स्वस्त झाली. 5 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली. आता 6 सप्टेंबर रोजी पुन्हा 500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो

चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम