ब्राह्मण समाजात कोणीही संभाजी नाव ठेवत नाही ; मंत्री भुजबळ यांची टीका !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही महिन्यापासून संभाजी भिडे ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करत आहे. त्यांच्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिकमधील मखमलाबाद शैक्षणिक संकुलात आयोजित ‘समाजदिन सोहळा’ या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, “काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि सत्तेत सामिल व्हा. बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि आपल्याला संविधान मिळालं”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम