‘त्या’ रेल्वे अपघात प्रकरणी ; सीबीआयकडे दिली जबाबदारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जून २०२३ ।  देशाला हादरवून टाकणारी घटना गेल्या दोन दिवसाआधी घडली आहे. ओडिशामधील बालासोर येथील तीन ट्रेनचा अपघात घातपात तर नव्हता ना असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. दरम्यान, सीबीआयचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक बालासोर येथील अपघातस्थळी पोहोचले आहे. चौकशी केली जात आहे,” असे पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले.

दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेची इंटरलॉकिंग सिस्टीम अत्यंत सुरक्षित असून त्यात त्रुटी राहण्यास फारसा वाव नसतो. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याशिवाय बदलता येत नाही. अधिकाऱ्याने दिलेल्या माहतीनंतर, बालासोर दुर्घटना हा अपघात नसून कट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.इंटरलॉकिंग सिस्टममध्ये मानवी हस्तक्षेपामागील हेतू शोधण्यासाठी सीबीआयद्वारे चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. कटक (Cuttack) येथील सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) रेल्वे कायद्याच्या कलम १५३, १५४ आणि १७५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पापू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम