दै. बातमीदार । ९ डिसेंबर २०२२ । राज्यात जरी थंडी वाढत असली तरी व्यापार क्षेत्रामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारासह, भारतीय वायदे बाजारात मात्र ग्राहकांना थंडीतहि चांगलाच घाम फोडला आहे. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीच्या सत्रात 0.14 टक्के तेजी दिसून आली. तर वायदे बाजारात चांदीने ही कमाल केली. चांदीच्या भावात आज 0.68 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोना आणि चांदीचे दरांनी आगेकूच केली होती.
शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात सकाळी 9:20 वाजता, कालच्या बंद भावानंतर 73 रुपयांची वृद्धी दिसून आली. सोन्याचा भाव 54,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज सोन्याचा भाव 53,999 रुपयांवर सुरु झाला. एकावेळी सोन्याचा भाव 54,201 रुपयांवर पोहचला. त्यानंतर त्यात घसरुन होऊन भाव 54,060 रुपये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीच्या भावात तेजी दिसून आली. चांदीच्या भावात कालच्या तुलनेत 456 रुपयांची वाढ झाली. चांदी 67,490 रुपये भावावर व्यापार करत होती. आजचा चांदीच्या भावात 67,362 रुपयांची वाढ झाली. एकावेळी चांदीचा भाव 67,546 रुपयांवर पोहचला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. शुक्रवारी सोन्याच्या भावात 0.71 टक्क्यांची वाढ झाली. सोने 1,793.79 डॉलर प्रति औसवर होते. तर चांदीच्या भावाने 2.36 टक्क्यांची उडी घेतली. चांदी 23.26 डॉलर प्रति औसवर आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात 4.79 टक्क्यांची वाढ तर चांदीत 8.12 टक्क्यांची वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात काल, गुरुवारी, सोने आणि चांदीच्या किंमतीत वृद्धी दिसून आली. दिल्लीत सोन्याचा भावात 211 रुपयांची वाढ होऊन ते 54,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली होती. सोन्याचा भाव 54,054 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम