निवडणुकीत शिंदे गटाच्या नेत्याला होमग्राऊंडमध्ये ठाकरे गटाचा जोरदार धक्का!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ ।  राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची व भाजपच्या देवेद्र फडणवीस यांची अनोळखी युती करीत सत्ता देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष हा बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. पण, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना आपल्याच होमग्राऊंडमध्ये धक्का बसला आहे. ठाकरे गटाने संजय राठोड यांच्या समितीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. यवतमाळमधील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. सेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे.

दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळवला आहे. तर संजय राठोड गटाचे फक्त 4 संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांचा हा मोठा विजय समजला जात आहे.

विशेष म्हणजे, संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असून शिवसेना शिंदे गटाचे नेते आहे. पण तरीही शिवसेना शिंदे गटाला यवतमाळ जिल्ह्यातच हादरा बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती. अखेरीस कॅबिनेट मंत्र्यालाच त्यांच्याच जिल्ह्यात महाविकास आघाडीने धूळ चारली आहे.

अमरावतीत काँग्रेसची एकहाती सत्ता, यशोमती ठाकूर यांचे उमेदवार विजयी तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. तिवसामधील सर्व 18 जागेचे निकाल हाती आले असून 18 पैकी 18जागी जागा आमदार यशोमती ठाकूर गटाच्या विजयी झाल्या आहे. त्यामुळे तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. (…तर प्रकल्प करायला हरकत नाही, बारसूसाठी अजितदादांनी सुचवला मार्ग) या विजयानंतर तिवसामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच सहकारच्या निवडणुकीत सहभाग घेतला आणि तिवसा बाजार समितीवर एक हाती सत्ता आणली आहे. तिवसा बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना एका बाजूला तर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट, बच्चू कडू यांची प्रहार यांनी निवडणूक लढविली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम