पहिल्याच महिन्यात आरबीआयने बँकेला दिल्या इतक्या सुट्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ डिसेंबर २०२२ । सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपण नेहमी सज्ज असतो पण आपले बँकेतील महत्वाची कामे करण्यास विलंब देखील यामध्ये होत असतो व त्यातच नव्या वर्षात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेकजण आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 दिवस बंद असणार आहेत. बँकेतील विविध राज्यातील सण आणि इतर कार्यक्रमांनुसार या सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या सुट्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.

वर्षांच्या सुरूवातीला म्हणजेच 1 जानेवारीला रविवारची सुट्टी असल्याने बँक कर्मचाऱ्यांना नववर्षाचा आनंद लुटता येणार आहे. तर 8 जानेवारी हा दुसरा रविवार, 14 जानेवारीला महिन्याचा दुसरा शनिवार, 15 जानेवारीला तिसरा रविवार, 22 जानेवारीला चौथा रविवार, 28 जानेवारीला चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला पाचवा रविवार असणार आहे. दरम्यान, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपुर्ण देशात सुट्टी असणार आहे. तर यासोबतच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 2 जानेवारीला आयझॉलमध्ये बँका बंद राहतील. गान-नागाई, मोइनू इरतपामुळे 3 आणि 4 जानेवारीला इंफाळमध्ये बँका बंद राहणार आहे. चेन्नईमध्ये 16 आणि 17 जानेवारीला तिरुवल्लुवर डे आणि उझावर तिरुनालच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम