महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचे भाव स्थिर तर चांदीत वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ ।  महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदीत किचिंत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय सराफ बाजारात आज २७ मार्च २०२३ ला सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आज सराफा बाजारात सोने आणि चांदी २६ मार्च दराने विकली जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे लेटेस्ट दर…

जर आपण सोन्याच्या किमतीबद्दल बोललो तर bankbazaar.com नुसार आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच 22 कॅरेट सोने रविवारी (26 मार्च 2023) 55,780 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. ते आज त्याच किंमतीला विकले जाईल. पण जर आपण (24 के सोने) 24 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर जे सोने 58,570 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. ते आजही त्याच किमतीत विकले जाईल. म्हणजेच आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम