मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावाने बस पेटवली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न धगधगत असतांना जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे राज्यभरात संतप्त पडसाद उमठत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 12 च्या सुमारास अज्ञात जमावाने मुख्य बसस्थानकात उभी असलेली बस औरंगाबाद- कोल्हापूर ही बस पेटवून दिली. अग्निशामक दल घटनास्थळी पोहचेपर्यंत बस अर्धी जळाली होती.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचे संतप्त पडसाद उमठत आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. असे असतानाही काही तरुणांनी मुख्य बसस्थानकात उभी असलेली बस मध्यरात्री पेटवून दिली. अनेक गाड्या बंद असल्याने प्रवासी बसस्थानकात बसून होते. या घटनेमुळे प्रवाशांत दहशतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत अर्धी बस जळाली होती.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याचे समजताच छत्रपती संभाजीनगर शहरात तरुण रस्त्यावर उतरले. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुल, वसंतराव नाईक चौक येथे तरुणांनी गर्दी करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा तरुणांनी दिल्या. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटाही घटनास्थळी पोहोचला व त्यांनी तरुणांना शांत केले. दरम्यान, आजही छत्रपती संभाजीनगर शहरात सकल मराठा समाजातर्फे आंदोलनाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम