येत्या पाच दिवसात या भागात होणार गारपीट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।  देशात बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुरु आहे. यात अनेक शेतकरीचे मोठे नुकसान देखील होत असून आता हवामान विभागाने रविवारी आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये म्हटले आहे की येत्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मध्य भारतात पुढील पाच दिवस ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

त्याचबरोबर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. IMD नुसार, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशात हिमवर्षाव, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानुसार, पुढील पाच दिवस पूर्व भारतात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. 1 मे आणि 2 मे रोजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि 1 मे ते 4 मे दरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशभरात पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अतिवृष्टीपासून आपली पिके वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम