राज्यात ‘या’ माशाला मिळाला राज्यमाशाचा दर्जा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ सप्टेंबर २०२३ | सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली आहे. या माशांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे या माशाचं संवर्धन होऊन त्यांची पैदास वाढावी यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा देण्यात आल्यानं त्याचं संवर्धन होण्यास मदत होणार आहे. या माशाला ग्राहकांची मोठी मागणी असते, त्यामुळे या माशाच्या विक्रीमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.मोठ्या प्रमाणात निर्यातमुंबईच्या मच्छिमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणत सिल्व्हर पापलेट विक्रीसाठी उपलब्ध असतो. तसेच या माशाची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन यातून परकीय चलन देखील देशाला मिळते. स्थानिक भाषेत या माशाला सरंगा म्हणून देखील ओळखलं जातं.

या माशावर एक टपाल तिकीट देखील जारी करण्यात आलं आहे. मात्र दिवसेंदिवस या माशांच्या उत्पादनात घट होत आहे. सिल्व्हर पापलेटचं उत्पन्न वाढवण्यासाठीच आता या माशाला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे.संवर्धनासाठी उपाययोजनासिल्व्हर पापलेट माशाला राज्य माशाचा दर्जा देण्यात आल्यानं आता त्याची पैदास वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. सिल्व्हर पापलेट माशाच्या माशेमारीच्या पद्धतीमध्ये देखील काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम