या दोन देशात झाली मास्क सक्ती ; इतके आढळले रुग्ण !
दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ । आशिया खंडातील काही देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशांमध्ये आठवड्याभराची करोना रुग्णाची संख्या वाढल्याचे दिसते आहे. सिंगापूरमध्ये यावर्षी फेब्रुवारीमध्ये मास्क सक्ती मागे घेण्यात आली.
तर इंडोनेशियामध्येही सार्वजनिक हालचालींवरील निर्बंध मागे घेतल्याने करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. व्हिएतनाममध्ये नवीन संसर्ग रोखण्यासाठी शाळांना 8 दिवसांची सुटी देण्यात आली आहे. आशियातील देशांमध्ये करोनाचा हा नवीन संसर्ग “एक्सबीबी’ यी सब व्हेरिएंटमुळे वाढत असल्याचे बहायला मिळते आहे. हा ओमायक्रोनचाच उपप्रकार असून यामुले आतापर्यंततरी गंभीर आजारपण उद्भवल्याची उदाहरणे दिसलेली नाहीत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम