राज्यातील या भागात अवकाळी पावसाने केले शेतकरीचे नुकसान !
दै. बातमीदार । ६ मार्च २०२३ । राज्यातील काही भागात दोन दिवसापासून अवकाळी पावसाने सुरु केले तांडवात शेतकरीचे नुकसान होत आहे. छत्रपती संभाजी नगरात देखील रात्री जोरदार पाऊस झाला तर नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेला बदल आणि हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसला. ५ मार्च पहाटे देखील अनेक भागात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर काल दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. अशातच मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता.
नाशिकसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम