देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे वडगाव बुद्रुक येथे उद्घाटन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख होते. सीमा सुरक्षा बलाचे माजी सैनिक गणसिंग पाटील यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन पार पडले. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, माजी नगरसेविका योजना पाटील, तालुका दक्षता समिती सदस्या रेखा पाटील, वडगाव ग्रामपंचायतचे सरपंच अजय गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामदास हौसरे, समाधान पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. मस्की यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी. डॉ. एन. व्ही. चिमणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.
तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ ही संकल्पना घेऊन सात दिवस चालणाऱ्या या विशेष शिबिरात विविध कार्यक्रम व उपक्रम पार पडणार आहेत. दि.16 जानेवारी रोजी ‘शाश्वत ग्राम विकास व जलसंवर्धन’ या विषयावर आदर्श कन्या माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे हे वक्ते म्हणून उपस्थित होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे होते.
दि.17 जानेवारी रोजी ‘व्होकल फॉर लोकल’ या विषयावर अरुण वाघ (प्रगतिशील व किसान प्रगती पुरस्कार विजेते शेतकरी) आणि कृषीपंडित राजेंद्र पाटील हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष प्रा. जी. एस. अहिरराव असतील. दि 18 रोजी कोरोना एड्स जनजागृती या विषयावर डॉ. निलेश पाटील (संचालक, समर्पण हॉस्पिटल, भडगाव) आणि नामदेव पाटील (समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय, भडगाव) हे वक्ते म्हणून उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील राहतील. दि.19 रोजी ‘ऊर्जा बचत : काळाची गरज’ या विषयावर शेखर महाजन (संचालक, सुदर्शन सोलर सिस्टिम) हे मत मांडतील. सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपक मराठे असतील. दि. 20 रोजी महिला मेळावा आयोजित केला आहे. याप्रसंगी ‘महिलांचे आरोग्य व बालविवाह प्रतिबंधक कायदा’ या विषयावर ॲड. आर. आर. पाटील (अध्यक्ष, तालुका वकील संघ, भडगाव) तसेच डॉ. सुवर्णा पाटील हे वक्त म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी डॉ. एस. डी. भैसे असतील. दि.21 रोजी ‘अन्नसुरक्षा जनजागृती’ या विषयावर डॉ. ए. एन. भंगाळे व डॉ. बी. एस. भालेराव हे आपले विचार मांडतील. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अतुल देशमुख असतील. शिबिराच्या अखेरच्या दिवशी ‘पशुचिकित्सा लंपी आजार’ या विषयावर डॉ. रणजीत पाटील (सहाय्यक आयुक्त, पशुवैद्यकीय विभाग, महाराष्ट्र शासन) हे वक्ते म्हणून उपस्थित असतील. या सत्राचे अध्यक्षस्थानी डॉ. ए. एन. भंगाळे राहतील.
श्रमदान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, बायोगॅस, प्लास्टिक मुक्त भारत व जनजागृती रॅली अशा विशेष उल्लेखनीय कार्यक्रमांसोबत या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम