आबू आझमी यांच्यावर इन्कम टॅक्सची कारवाई

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ देशात गेल्या काही दिवसापासून बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधीतावर मोठी कारवाई सुरु असतानाच आज राज्यातील समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्यावर आता इन्कम टॅक्स विभागानं मोर्चा वळवला आहे. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे.

कुलाब्यातील कमल मेंशन या इमारतीत इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. या ठिकाणी अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचं कार्यालय आहे. तर वाराणसीत विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात छापेमारी झाली. आरोप करण्यात आला आहे की, अभा गुप्ताद्वारे कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुप देखील इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहे. इन्कम टॅक्स विभागानं हवाला ऑपरेटर्सकडे छापेमारी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम