संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? महामोर्चा एवजी क्रांती मोर्चाचा व्हिडीओ केला व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ डिसेंबर २०२२ । राज्यात नुकताच भाजपला प्रतिउत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले होते पण याच मोर्चावर आता भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेत या मोर्चात गर्दीच नव्हती असे बोलल्याने ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला पण तो व्हिडीओ मराठा मोर्चाचा आहे. मराठा क्रांती मोर्चाही संजय राऊतांविरोधात आक्रमक झाला आहे. या व्हिडिओप्रकरणी आज शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर नॅनो मोर्चा म्हणून टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर म्हणून संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. मात्र, या ट्विटमधील व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करताच मराठा क्रांती मोर्चाने यावर आक्षेप घेतला आहे व हा मोर्चा महाविकास आघाडीचा नसून मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचे म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम म्हणाले की, संजय राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी. अन्यथा तुमच तोंड काळ केल्याशिवाय मराठा तरुण शांत बसणार नाही. तसेच, याप्रकरणी आज शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे तक्रार देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांना लक्ष्य करत या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

जरूर चौकशी करा – संजय राऊत
संजय राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओची चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले, मराठा मोर्चा ही सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती. याची सरकारने चौकशी करावी. आपल्या चोर कंपनीला क्लीन टिच देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम