दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । चीनमध्ये सुरु झालेल्या कोरोनाने जगभरात चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय आणि सिनेमा हॉलमध्ये मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिर्डी, शनी शिंगणापूर येथे मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीने मास्कचा वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेता, देशात मास्क विक्री वाढण्याची शक्यता आहे. बाजारात मास्कचा पुरेसा साठा आहे. तरीही मास्कच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
मास्कच्या मागणीत जवळपास 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश गुप्ता यांच्या मते, कोरोनाच्या भीतीने मास्कच्या विक्रीत वाढ होत आहे. कोरोनाविरोधात प्रभावी सर्जिकल मास्कच्या विक्रीत वाढ झाली आहे.मास्कसोबतच सॅनिटायझर, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, औषधं यांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घाऊक बाजारात मास्क आणि इतर साहित्याची विक्री वाढली आहे. किरकोळ विक्रीतही वाढ होत आहे. सॅनिटायझरच्या विक्रीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. थर्मामीटर आणि ऑक्सिमीटरच्या विक्रीत 1 ते 2 टक्क्यांचा वाढ झाला आहे.
घाऊक व्यापाऱ्यांच्या मते, पहिल्या दिवसापासून मास्कच्या भावात 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कैलाश गुप्ता यांच्या मते भावात 15 टक्के वाढ झाली आहे. पण कोरोनाची भीती लक्षात घेता भावात 30 ते 35 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्पादकांनी आतापासूनच भावात वाढ केल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या मते उत्पादकांनी भावात 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. याचा अर्थ यापूर्वी 100 रुपयात मिळणारे उत्पादन आता 125 रुपयात मिळत आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. थ्री लेअर डिस्पोजेबल मास्कची किंमत 90 रुपये होती, ती आता 120 रुपये झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम