भारत हा भारतच राहिला पाहिजे ; मोहन भागवत !
दै. बातमीदार । ११ जानेवारी २०२३ । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज पत्रकार परिषेदत बोलतांना देशातील मुस्लीम बांधवाना सल्ला दिला आहे तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही असे सुद्धा वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
माध्यमांशी बोलताना भागवत म्हणाले, ‘भारतात मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच गरज नाही. पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे. आपण देशावर एकदा राज्य केलं आणि पुन्हा राज्य करू या विचारसरणीतून बाहेर यायला हवं. आज भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणतीही अडचण नाही. भारत हा भारतच राहिला पाहिजे हे साधं सत्य आहे.’
आपणच श्रेष्ठ आहोत या विचारातून मुस्लिमांनी बाहेर पडावं. सत्य हे आहे की इथं जो कोणी राहतो. मग, तो हिंदू असो वा कम्युनिस्ट, त्यानं या तर्कातून बाहेर आलं पाहिजे. संघानं नेहमीच राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवलंय, पण जे राजकारण आपल्या देशाचं धोरण ठरवतं ते राष्ट्रहिताशी निगडीत आहे. ते हिंदूंच्या हिताचं आहे. आम्ही त्याच्याशी सदैव संलग्न आहोत. फरक एवढाच की, पूर्वीचे स्वयंसेवक सत्तेत नव्हते. आजच्या परिस्थितीत हा एकमेव बदल आहे. संघ समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतो, असंही भागवत यांनी सांगितलं.
हिंदू ही आपली ओळख, आपली सभ्यता, आपलं राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येकाला आपलं मानणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा गुण आहे. फक्त आमचं बरोबर, तुमचं चूक असं आम्ही कधीच म्हणत नाही. तू तुझ्या जागी बरोबर आहेस, मी माझ्या जागी बरोबर आहे. शेवटी संघर्ष करण्याची काय गरज आहे, चला एकत्र पुढं जाऊया. हे हिंदुत्व आहे, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम