
टीव्ही अभिनेत्री शर्माने उचलले टोकाचे पाऊल !
दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ ।टीव्ही अभिनेत्री असलेली व अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिका निभावलेली अभिनेत्री टुनिशा शर्मा हिने सेटवर आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
नायगाव येथे टुनिशा शर्माचं शूटिंग सुरु होतं. मालिकेच्या सेटवरील वॉश रुममध्ये तिने आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती आहे. आतमध्ये गेलेली टुनिशा खूप वेळ बाहेर येत नसल्याने सहकाऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला. सेटवरील सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. टुनिशाचं वय २० वर्षे होतं. टुनिशाने आपली जीवनयात्रा का केली? याचं कारण समजू शकलेलं नाही. मालिकेचं शूटिंग सुरु असतांना सेटवरच तिने टोकाचे पाऊल का उचलले त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टुनिशाला लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये तिचा जन्म झाला. झाला. अवघ्या 14 व्या वर्षी तिची ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ या मालिकेसाठी निवड झाली होती. ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या. तिच्या अचानक एक्झिटने हळहळ व्यक्त केली जातेय.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम