Indian Merchant Navy Recruitment : तरुणांसाठी मर्चंट नेव्हीमध्ये ४१०८ पदांवर मोठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | देशातील अनेक तरुणांना मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून लाईफ सेट करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं.

मर्चंट नेव्हीने विविध विभागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीची अधिसूचना जारी केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार, सदर भरती मोहीम डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सी मॅन आणि कुक या पदांच्या भरतीसाठी राबवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार https://sealanemaritime.in वर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांना ३० एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करता येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आवश्यक फी सह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी; असे आवाहन करण्यात आले आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे १०वी आणि १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही अर्जाच्या वेबसाइटवरून पात्रतेबाबत अधिक तपशील मिळवू शकता.

अर्ज फी –
सर्व पदांसाठी अर्ज शुल्क समान आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन मोडद्वारे १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

मर्चंट नेव्ही भर्ती २०२४ साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी वयाचे काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदांसाठी किमान वयाची अट १७.५ वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. ३० एप्रिल २०२४ रोजी वयाची गणना केली जाईल. याव्यतिरिक्त, SC आणि ST उमेदवार सरकारी नियमांनुसार वय शिथिलतेसाठी पात्र आहेत.

मिळणारे वेतन –
डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सी मॅन आणि कुक यासह इतर अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार असून निवड झाल्यावर, उमेदवारांना पदानुसार ३५०० ते ५५०० रुपये या प्रमाणात मासिक वेतन मिळेल.

परीक्षेची तारीख – परीक्षेची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, अधिकृत अधिसूचनेनुसार, भरती प्रक्रिया २०२४ मध्ये होणार आहे.

भारतीय मर्चंट नेव्ही भरती मोहीम पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विविध विभागांमध्ये सामील होण्याची संधी देत आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे अर्ज सादर करून आगामी भरती प्रक्रियेची तयारी करावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम