जगातील बाजारात भारताचा शिक्का ; शरद पवार
दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३ इंदापूर तालुक्यातील बोरी गावात शरद पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, ५ वर्षांपूर्वी फळबाग लागवडीच्या संबंधित प्रचार राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली होती. आज भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. अनेक देशात गेलो की तेथील बाजरात जातो. तेव्हा मला त्या बाजारात भारताचा शिक्का बघायला मिळतो असेही पवार म्हणाले. आज देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. परदेशातही द्राक्षाची निर्यात होत असल्याचे पवार म्हणाले.
एकेकाळी 86 टक्के लोक शेती करायचे तो आकडा 60 टक्क्यांवर आला असल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. या दैऱ्यात त्यांनी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की त्याबद्दल जास्त आत्मयिता आहे. प्रतिकूल परिस्थितीवर तेथील शेतकरी मात करुन चांगली शेती करत असल्याचे शरद पवार म्हणाले. 15 वर्षांपूर्वी फळबाग लागवड संबंधित प्रचार हा राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली आज जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश भारत असल्याचे पवार म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम