भारताचा ‘हा’ खेळाडू ठरलं अव्वल फलंदाज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । देशातील अनेक क्रिकेटप्रेमीना आपल्या आवडत्या खेळाडूबाबत विशेष प्रेम असते. त्यातील एक सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असलेला रोहित शर्मा आणखी एकदा चर्चेत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीनुसार कर्णधार रोहित शर्मा हा भारताचा अव्वल फलंदाज ठरला. पुन्हा एकदा अव्वल दहामध्ये स्थान मिळवताना रोहितने तीन स्थानांनी प्रगती करत दहावे स्थान पटकावले. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही झोकात क्रमवारीत प्रवेश करताना ७३वे स्थान मिळवले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार शतक झळकावत रोहितने तीन स्थानांनी झेप घेतली. ऋषभ पंतची एका स्थानाने अकराव्या क्रमांकावर घसरण झाली. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन अव्वल स्थानी असून त्यानंतर ट्रॅविस हेड (ऑस्ट्रेलिया) आणि बाबर आझम (पाकिस्तान) यांचा क्रमांक आहे. विंडीजविरुद्ध पदार्पणात कसोटी शतक झळकावलेल्या यशस्वीने क्रमवारीत दिमाखात प्रवेश घेताना ७३वे स्थान मिळवले. गोलंदाजांमध्ये भारताच्या रविचंद्रन अश्विनने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानी असून दोघांमध्ये ५६ गुणांचे मोठे अंतर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम