भडकाऊ भाषणं आले अंगलट : आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी आणि भडकाऊ भाषणं केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

अनेक प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यामुळे आझम खान यांची आमदारकी गेलेली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर होते. रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आझम खान यांनी भडकाऊ भाषणं केली होती. तत्कालीन व्हीडिओ सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी (एसडीओ) अनिल कुमार चौहान यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होती. शिवाय त्यांनी केलेली विधानं सोशल मीडियात व्हायरल झालेली होती. आज रामपूरच्या कोर्टाने आझम खान यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. २०१९मध्ये सपा आणि बसपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. आझम खान हे निवडून आले मात्र नंतर त्यांची आमदारकी रद्द झाली. रामपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम