
नगरसेवक निखिल चौधरीचा पुढाकार; अंबरनाथ ईस्ट–वेस्ट रेल्वे ओव्हर ब्रिज परिसराची साफसफाई
ठाणे(प्रतिनिधी )- अंबरनाथ शहरातील ईस्ट–वेस्ट रेल्वे ओव्हर ब्रिज वर परिसराची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, घाण व दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तात्काळ स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
स्वच्छता विभागाच्या सहकार्याने कचरा उचलणे, व साचलेली घाण हटवणे तसेच परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला आहे. या कामामुळे परिसर आता स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांसाठी वापरण्यायोग्य झाला आहे.
शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी तंबाकू पान खावून घाण ,कचरा न टाकता सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम