राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? माजी खासदाराने सोडला पक्ष !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ नोव्हेबर २०२२ । राज्यात शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्या गटात विविध पक्षातून नेते मंडळी येत असतांना ठाकरे गटातील सुद्धा नेते शिंदे गटात दाखल होत आहे तर गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीवर नाराज असलेले खा.अमोल कोल्हे हे सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा आहेत.

खासदार अमोल कोल्हे यांचे नाव गुजरात निवडणूकीसाठीच्या स्टार प्रचारकांमधून वगळल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. यादरम्यान राष्ट्रवादीचे दुसरे नेते माजी खासदार माजिद मेमन यांनी 16 वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहिल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे, त्यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

 

मेमन यांनी तात्काळ पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असून, त्यांनी शरद पवार यांचे आभार देखील माणले आहेत. “माझ्या 16 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला सन्मान आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचे मी आभार मानतो. वैयक्तिक कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्व सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा” मेमन हे २०१४ ते २०२० या कालावधीत राज्यसभा खासदार होते. दरम्यान माजिद मेमन यांना पक्षाच्या सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे बोलले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम