गुजरातमध्ये भाजपात अंतर्गत कलह ; माजी मंत्र्याने व्यक्त केली नाराजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । भाजपने गुजरात निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मॅजिक पुन्हा चाललं असून, सलग सातव्यांदा इथं कमळ फुललं आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपला दोन तृतीयांश पेक्षा जास्त विक्रमी 156 जागांवर विजय मिळाला आहे.

काँग्रेसला १७ जागांवर समाधान मानावं लागलं. तर, आम आदमी पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या. दुसरीकडं दिल्ली महापालिकेपाठोपाठ हिमाचल प्रदेशमध्ये भाजपनं सत्ता गमावलीय. हिमाचलमध्ये 68 पैकी 40 जागा जिंकत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. इथं भाजपला 25 जागांपर्यंतच मजल मारता आली. मात्र, एकीकडं गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा होत असतानाच, भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. दरम्यान, नेत्यांच्या नाराजीमुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. माजी राज्यमंत्री नानू वनाणी यांनी खुलं पत्र लिहून पक्षातील कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. गुजरात भाजपमध्ये लहान कार्यकर्त्यांची काळजी घेणारं आता कोणीच नाहीये. मी सध्याच्या परिस्थितीबद्दल खूपच अस्वस्थ आहे, असं त्यांनी म्हटलंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम