ठाकरे गटाचे ४४८२ प्रतिज्ञापत्रांचा तपास सुरू ; सत्य बाहेर येणार – अहीर

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ ।  केवळ कोपरगावच्या 200 प्रतिज्ञापत्रांमध्ये काहीही बेकायदेशीर आढळून आले नाही. उर्वरित ४४८२ प्रतिज्ञापत्रांचा तपास सुरू आहे, मुंबई गुन्हे शाखेने बोगस प्रतित्रापत्रप्रकरणी ठाकरे गटाला क्लिन चीट दिलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेतील सुत्रांनी दिली आहे.असे मुंबई गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले आहे.

आज काही वृत्तवाहिन्या तसेच वृत्तसंकेतस्थळांवर बोगस प्रतिज्ञापत्रप्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने पूर्ण केला असून ठाकरे गटाला पूर्ण क्लिन चीट दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबई गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क केला असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

मुंबई गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना मुंबईत 4, 682 बनावट शपथपत्रे आढळून आली आहे. त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आम्ही कोपरगाव येथील 200 प्रतिज्ञापत्रांचा तपास पूर्ण केला आहे. तपासात काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. मात्र, उर्वरित शपथपत्रांचा तपास अद्याप बाकी आहे.

ठाकरे गटाच्या आक्षेपार्ह म्हणून जप्त केलेल्या 4, 682 पैकी 200 प्रतिज्ञापत्रात काहीही बेकायदेशीर आढळून न आल्यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेचे आमदार व प्रवक्ते सचिन अहीर म्हणाले की, विरोधकांचे डावपेच फसले आहेत. गुन्हे शाखेच्या पुढील तपासातही आम्ही आक्षेपार्ह काहीही केले नाही, हे सत्य बाहेर येईल, असा माझा पूर्ण विश्वास आहे.

शिवसेनेच्या पुर्व-विदर्भ महिला संपर्क प्रमुख प्रा.शिल्पा बोडखे म्हणाल्या की, बनावट शपथपत्राप्रकरणी शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रांमध्ये काहीही आक्षेपार्ह्य नाही. विरोधकांनी रचलेले षड्यंत्र फसले आहे.

आमदार अहिर म्हणाले की, आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे विरोधकांचे खोटे आरोप तपासात उघडकीस येतील ,असा आम्हाला विश्वास होता. आमच्यासमोर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आम्ही कसे चुकीचे आहोत आणि ते कसे बरोबर आहेत? हे सिद्ध करण्याचा अयशस्वी प्रयत्न होत आहे. मात्र आता पोलीस तपासात त्याचा खोटेपणा उघड झाला आहे. आम्ही सगळ्यांना समोर बोलावून विचारपूस केली. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दिले आहे की नाही, याचीही चौकशी केली. सर्वांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. हे त्यांनी आमच्या समोर सांगितले आहे. ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिले त्यांचे लेखी जबाब आम्ही नोंदवले आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्र दिल्याचे मान्य केले असल्याने पकडले प्रतिज्ञापत्र बोगस आहे, हे समोर आलेले नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम