‘या’ शेअरमधील गुंतवणूकदारांना मिळाला कोट्यावंधीचा नफा !
बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसापासून आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमी चढ उतार होत असल्याने अनेक ग्राहकांचा जीव धोक्यात आला आहोत पण शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. याआधी सलग 3 दिवस बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं कामकाजाच्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी 474 अंकांची उसळी घेतली. त्याचवेळी निफ्टी 19,500 च्या पुढे पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
आजच्या व्यवहारात सर्वात जास्त फायदा आयटी, टेलिकॉम, सर्व्हिसेस आणि बँकिंग शेअर्समध्ये दिसून आला. मात्र, ऑटो आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक 0.65 टक्क्यांच्या जवळपास बंद झाले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईमधील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 480.57 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी वधारून 65,240.68 वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 133.35 अंकांनी किंवा 0.70 टक्क्यांनी वधारून 19,514.65 वर बंद झाला. शुक्रवारी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 304.00 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी 302.29 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम