गुंतवणूकदार नाराज ; शेअर बाजारात घसरण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ सप्टेंबर २०२३

देशात सुरु असलेल्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे तर दुसरीकडे जागतिक शेअर बाजारात घसरणीचा कल तिसऱ्या दिवशीदेखील कायम राहिला. जागतिक बाजारातील नरमाईमुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी वाहन, बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री केली. परिणामी सेन्सेक्सने ५७०.६० अंकांनी आपटी खाल्ली. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने यावर्षी धोरणात्मक दरांमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर जगभरातील शेअर बाजार गडगडले. त्याचा नकारात्मक परिणाम देशातील भांडवल बाजारावरदेखील झाला.

सेन्सेक्स ५७०.६० अंकांनी घसरून ६६, २३०.२४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स ६७२.१३ अंकांपर्यंत घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १५९.०५ अंकांनी घसरून १९,७४२.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक या समभागांना विक्रीचा फटका बसला. पण टेक महिंद्रा, भारती एअरटेल, इन्फोसिस, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर या समभागांची चांगली खरेदी झाली. कोटक सिक्युरिटीज लि. संशोधनाचे प्रमुख श्रीकांत चौहान यांनी जागतिक बाजारातील नरमाईच्या वातावरणामुळे सलग तिसऱ्या दिवशी देशांतर्गत बाजारात विक्री झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यावर्षी धोरणात्मक दरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, असे मत व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम