आंतर विभागीय हॉकी संघात ईकराचे १० खेळाडूंची निवड

बातमी शेअर करा...

आंतर विभागीय हॉकी संघात ईकराचे १० खेळाडूंची निवड

जळगाव प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे जळगाव विभाग अन्तर्गत “अंतर महाविद्यालयीन हॉकी निवड चाचणी” हे नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी जळगाव जिल्हा येथिल ईकरा एच जे थीम महाविद्यालय, व्ही.एस. नाईक महाविद्यालय, डी एन सी व्ही पी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव. अशा एकूण 27 खेळाडू यांनी सहभाग घेतला होता.

या निवड चाचणीतून एकूण १८ खेळाडू यांची निवड करण्यात आली. त्यात इकरा एच जे थीम महाविद्यालय चे १० खेळाडूंची उत्कृष्ठ खेळा मुळे निवड कऱण्यात आली. या खेळाडूंना प्राध्यापक डॉक्टर चांद खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल कलाम सालार डॉक्टर इकबाल शहा, सचिव एजाज मलिक तसेच इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वकार शेख,प्रा.डॉ.तनवीर खान, प्राध्यापक मंडळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम